Mumbai Municipal Corporation Election : देशातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची असून, त्यादृष्टीने पक्षाकडून रणनिती आखली जात आहे. २२७ प्रभाग असलेल्या या महापालिका निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष्य लागलेले आहे. यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल लागणार आहे. त्यानंतरच मुंबई कुणाचे? याचे उत्तर मिळणार आहे. यासाठी भाजपाने जोरदार कंबर कसली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० जणांची निवडणूक समितीची घोषणा केली आहे. या समितीत भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर जागावाटपावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपासंदर्भात दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांच्या दुसऱ्या संयुक्त बैठकीत १५० जागांवर सहमती झाली आहे. तर उर्वरित ७७ जागांवर एकमत होणे बाकी असून त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, २२७ जागांपैकी दीडशे जागांवर सहमती झाली असली तरी कोणती जागा कोण लढणार आहे आणि कोणती जागा कुणाला सुटली आहे, याबाबत नेत्यांनी सांगितलेले नाही. मोठी कसरत करावी लागणार ज्या जागांवर तिढा सुटणार नाही, यासाठी फडणवीस आणि शिंदे जागावाटपाचा तिढा सोडवतील असेही नेत्यांकडून सांगितले जात आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या असून, निवड करताना मोठे आव्हान दोन्ही पक्षासमोर असणार आहे. ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांची नाराजी दूर करणे गरजेचे असणार आहे. यासाठी कशा पद्धतीने निर्णय घेतले जातात. ज्यांना संधी मिळणार नाही यांची मनधरणी कशी केली जाते यावर राजकारण अवलंबून असणार आहे. मोठी कसरत यासाठी दोन्ही पक्षांना करावी लागणार आहे. ‘हे’ शिलेदार असणार मैदानात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार केंद्रीय मंत्री पियुष गोयल राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद अतुल भातखळकर, आमदार भाई गिरकर, माजी मंत्री योगेश सागर, आमदार पराग अळवणी, आमदार मिहीर कोटेचा, आमदार प्रसाद लाड, आमदार मनिषा चौधरी, आमदार चित्रा वाघ, आमदार राजेश शिरवडकर, महामंत्री, मुंबई भाजपा गणेश खणकर, महामंत्री, मुंबई भाजपा आचार्य पवन त्रिपाठी, महामंत्री, मुंबई भाजपा श्वेता परुळकर, महामंत्री, मुंबई भाजपा प्रभाकर शिंदे, माजी गटनेता, मनपा हेही वाचा : ऐन निवडणुकांच्या काळात शिंदेंचा आमदार अडचणीत; गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश, काय आहे प्रकरण?