मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर (BMC) आगामी निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2025) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शिंदे विरुद्ध ठाकरे: सद्यस्थिती काय? २०१७ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये झालेल्या ऐतिहासिक पक्षफुटीमुळे महानगरपालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळही विभागले गेले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे सद्यस्थितीत किती माजी नगरसेवक आहेत, याचा ‘A टू Z’ तपशील जाणून घेऊया.. तपशील उद्धव ठाकरे (शिवसेना) एकनाथ शिंदे (शिवसेना) २०१७ मध्ये निवडून आलेले ८४ – नंतर अपक्षांचे प्रवेश + ४ (एकूण ८८) – मनसे नगरसेवकांचे प्रवेश + ६ (एकूण ९४) – जात पडताळणी/पोटनिवडणूक + ५ (एकूण ९९) – सध्याचे माजी नगरसेवक ५५ ४४ एकूण ९९ ४४ (शिंदेंच्या गटात गेलेले) दरम्यान, ९९ माजी नगरसेवकांपैकी ४४ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर ५५ माजी नगरसेवक अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिंदे गटात सामील झालेल्या महत्त्वाच्या माजी नगरसेवकांची नावे – पक्षफुटीनंतर अनेक माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये शीतल म्हात्रे,यशवंत जाधव, सुवर्णा कारंजे, परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, दिलीप लांडे, मानसी दळवी, किरण लांडगे, समाधान सरवणकर, अमेय घोले, संतोष खरात, दत्ता नरवणकर, सान्वी तांडेल, आत्माराम चाचे यांचाही समावेश आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रभाग रचना आता अंतिम झाली आहे. प्रभागांची एकूण संख्या २२७ आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व २२७ प्रभागांची अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रामध्ये आणि महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण ४९४ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या, ज्यांचा विचार करून नगरविकास विभागाने अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या १ कोटी २४ लाख ३३७ इतकी आहे. ही लोकसंख्या २२७ प्रभागांमध्ये विभागली गेली आहे. आज आरक्षण सोडत जाहीर – मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता निवडणुकीच्या तयारीला आणखी वेग येणार आहे. राजकीय पक्षांना आता आरक्षित जागांवर आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. आरक्षण सोडतीमुळे आता मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात निवडणुकीची तयारी आणि उमेदवारांची चाचपणी सुरू होईल. शिंदे आणि ठाकरे गटातील माजी नगरसेवकांचे संख्याबळ पाहता, ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 114 प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित झालेत. अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड राखीव झालेत. त्यापैकी 8 वॉर्ड हे अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी आरक्षित झालेत.