दहिवडी (प्रतिनिधी) – दहिवडी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस सहदेव चंद्रकांत साबळे व सागर विलास लोखंडे यांनी एप्रिल २०२४ मध्ये कालावधीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बेस्ट पोलीस ऑफ द मंथ २०२४ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
दहिवडी शहरासह दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी काटेकोरपणे अंमलबजावणी केली असून. अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचा पाठलाग करताना स्वतःच्या जीवाचा विचार न करता भरदा वेगाने गाडी चालवून चोरटी दारू वाहतूक अनेकदा पकडली.
दहिवडी कॉलेज परिसरातील रोडरोमिओ व अल्पवयीन गाडी चालक विद्यार्थी यांच्यावर दंडात्मक कारवाई करून वाहतुकीचे नियम पटवून दिले. दहिवडी परिसरातील शिखर शिंगणापूर, वारूगड, गोंदवले, वावरहिरे,
मोही गावातील यात्रा मोठ्या प्रमाणावर भरतात त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून. वाहतुकीचे योग्य नियोजन करून यात्रा सुरळीत पार पडण्याचे काम चांगल्या प्रकारे केले असल्यामुळे त्यांना बेस्ट पोलीस ऑफ द मंथ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.