IPL 2025 चे वेळापत्रक बदलले! KKR vs LSG सामना आता ‘या’ तारखेला होणार, जाणून घ्या कारण

IPL 2025 KKR vs LSG match rescheduled due to Ram Navami : आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वेळापत्रकानुसार, कोलकाता आणि लखनऊ ६ एप्रिल (रविवार) रोजी आमनेसामने येणार होते पण आता हा सामना ८ एप्रिल रोजी होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी याची पुष्टी केली. रामनवमीमुळे या सामन्याच्या वेळापत्रकात बजल करण्यात आला आहे.
केकेआर आणि एलएसजी यांच्यातील हा सामना आता ६ एप्रिलऐवजी ८ एप्रिल रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. सुरक्षेच्या कारणास्तव रामनवमी दरम्यान सामना आयोजित करणे कठीण झाले असते, त्यामुळे कोलकाता पोलिसांच्या विनंतीवरून हा बदल करण्यात आला आहे.
🚨 News 🚨
Match No. 19 of #TATAIPL 2025 between #KKR and #LSG at Eden Gardens, Kolkata has been rescheduled from Sunday, April 6th to Tuesday, April 8th at 3.30 PM IST.
Read to know more 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना कोलकाता येथेच होणार आहे, तर पूर्वी असा अंदाज लावला जात होता की हा सामना गुवाहाटीत होऊ शकतो. बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “रामनवमी सणामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असल्याने कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशन (सीएबी) ला या सामन्याचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती.”
हेही वाचा – CSK vs RCB : हेल्मेटवर चेंडू मारल्याचा विराटने घेतला बदला, VIDEO होतोय व्हायरल
त्यामध्ये पुढे म्हटले आहे की, “अधिकाऱ्यांनी ८ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता सामना आयोजित करण्याची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली आहे. आता ८ एप्रिल रोजी दोन सामने होतील. केकेआर आणि एलएसजी यांच्यातील सामना दुपारी खेळवला जाईल तर पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना संध्याकाळी न्यू चंदीगड येथे खेळवला जाईल.” २०२४ च्या आयपीएल हंगामातही रामनवमी सणाला सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीसांनवर ताण असल्या कारणाने केकेआर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल सामन्याची तारीख बदलावी लागली होती.





