Ajinkya Rahane Six : अजिंक्य रहाणेचा अजब ‘सिक्सर’! हातातील बॅट निसटली तरी चेंडू सीमारेषेबाहेर; फॅन्सही अवाक्, पाहा VIDEO
Ajinkya Rahane Six : केकेआर विरुद्ध एलएसजी सामन्यात अजिंक्य रहाणेने मारलेल्या षटकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

Ajinkya Rahane Bat Slip Six IPL 2026 : आयपीएल १९व्या हंगामातील केकेआर आणि एलएसजी यांच्यातील सामन्यात अजिंक्य रहाणेचा एक अनोखा अवतार पाहायला मिळाला. क्लासिक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य रहाणेने ईडन गार्डन्सवर असा काही षटकार ठोकला, ज्याची चर्चा आता संपूर्ण क्रिकेट विश्वात होत आहे. ज्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
हातातून सटकली बॅट तरी पण षटकार –
केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने एलएसजीविरुद्ध मारलेला एका षटकारने सर्वांच्या भुवया उंचावल्या. सहसा टायमिंग आणि नजाकतीवर भर देणाऱ्या रहाणेने आवेश खानच्या गोलंदाजीवर एक असा शॉट खेळला जो क्वचितच पाहायला मिळतो. शॉट मारताना रहाणेच्या हातातील पकड सुटली आणि बॅट हवेत उडून स्क्वेअर लेगला जाऊन पडली, तरीही चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंटच्या वरून थेट षटकारासाठी गेला.
𝘽𝙖𝙩 𝙜𝙤𝙣𝙚, 𝙗𝙖𝙡𝙡 𝙜𝙤𝙣𝙚 𝙩𝙤𝙤…😅
Ajinkya Rahane just proved that you don’t even need to be holding the bat to clear the ropes 🙌#TATAIPL 2026 | #KKRvLSG | LIVE NOW 👉 https://t.co/2ISFQDaiMT pic.twitter.com/EDttpB8Utl
— Star Sports (@StarSportsIndia) April 9, 2026
अजिंक्यला अर्धशतकाने दिली हुलकावणी –
अजिंक्य रहाणे आज मोठ्या खेळीच्या इराद्याने मैदानात उतरला होता, मात्र दुर्दैवाने त्याचे अर्धशतक अवघ्या ९ धावांनी हुकले. दिग्वेश राठीच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात रहाणे ४१ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीने त्याचा सुरेख झेल टिपला. रहाणेने आपल्या २४ चेंडूंच्या खेळीत ४ चौकार आणि २ षटकार मारले. बाद झाल्यानंतर रहाणेच्या चेहऱ्यावरअर्धशतक पूर्ण न केल्याची निराशा स्पष्ट दिसत होती.
रघुवंशीसोबत साकारली महत्त्वाची भागीदारी –
फिन ॲलन स्वस्तात बाद झाल्यानंतर केकेआरचा संघ अडचणीत सापडला होता. अशा वेळी रहाणेने तरुण फलंदाज अंगकृष रघुवंशीसोबत मिळून डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ८४ धावांची भक्कम भागीदारी केली. रघुवंशीने देखील ३३ चेंडूत ४५ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांच्या भागीदारीमुळेच केकेआरला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.





