Finn Allen Controversial Catch : फिन ॲलन OUT की NOT OUT? बाउंड्रीवरील ‘त्या’ कॅचमुळे आयपीएलमध्ये नवा वाद, पाहा VIDEO
Finn Allen Controversial Catch : फिन ॲलनच्या विकेटवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून त्याच्या कॅचचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Finn Allen Controversial Catch KKR vs LSG : आयपीएल २०२६ च्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जाएंट्स (LSG) यांच्यातील सामन्यात एक मोठा वाद निर्माण झाला आहे. ईडन गार्डन्सवरील या लढतीत केकेआरचा सलामीवीर फिन ॲलन याच्या विकेटवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या सामन्यात केकेआरने घरच्या मैदानावर टॉस गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र दुसऱ्याच षटकात संघाला मोठा धक्का बसला. लखनौचा गोलंदाज प्रिन्स यादवच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात फिन ॲलनचा झेल थर्ड मॅनला उभ्या असलेल्या दिग्वेश सिंग राठीने टिपला. मात्र, हा झेल घेताना राठीचा पाय बाउंड्री लाईनला स्पर्श करत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते, तरीही पंचांनी त्याला बाद घोषित केले.
नेमका वाद काय?
Digvesh Rathi ಹಿಡಿದ ಈ ಕ್ಯಾಚ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವೇನು ಅಣ್ತಮ್ಮಾಸ್?🤔
ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL2026 👉 #KKRvsLSG | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.
#TATAIPL pic.twitter.com/HRWWVypBMN
— Star Sports Kannada (@StarSportsKan) April 9, 2026
दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर फिन ॲलनने मारलेला चेंडू हवेत बराच उंच गेला. दिग्वेश राठीने पळत जाऊन चेंडू झेलला, पण यावेळी तो बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ होता. व्हिडिओमध्ये असे दिसून आले की, झेल पूर्ण करताना राठीचा पाय बाउंड्रीला लागला होता आणि तिथला पडदाही (Advertising Curtain) किंचित हालला होता. नियमानुसार हा षटकार असायला हवा होता, परंतु मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची (Third Umpire) मदत न घेता फलंदाजाला बाद ठरवले.
चूक नेमकी कोणाची?
ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಇದು Out? ಅಥವಾ Not out?👀
ವೀಕ್ಷಿಸಿ | #TATAIPL2026 👉 #KKRvsLSG | LIVE NOW | ನಿಮ್ಮ Star Sports ಕನ್ನಡ & JioHotstar ನಲ್ಲಿ.
#TATAIPL pic.twitter.com/Gz6D0iEMSB
— Star Sports Kannada (@StarSportsKan) April 9, 2026
या वादात पंचांच्या भूमिकेवर टीका होत आहे. महत्त्वाच्या विकेटच्या वेळी तंत्रज्ञानाचा वापर न करणे ही पंचांची मोठी चूक मानली जात आहे. त्याचबरोबर, फिन ॲलननेही पंचांच्या निर्णयावर आक्षेप न घेता थेट पव्हेलियनची वाट धरली. जर त्याने रिव्ह्यूची मागणी केली असती किंवा पंचांना तपासायला सांगितले असते, तर कदाचित तो नाबाद राहिला असता. अवघ्या ९ धावांवर बाद झालेल्या फिन ॲलनच्या या विकेटमुळे केकेआरची सुरुवात खराब झाली आहे.





