Mukul Choudhary : कोण आहे मुकुल चौधरी? जो केकेआरची दाणादाण उडवत एका रात्रीत बनला लखनौचा नवा सुपरस्टार
Mukul Choudhary : आयपीएल २०२६ च्या हंगामात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एका नव्या ताऱ्याचा उदय झाला आहे. ज्याचं नाव आहे मुकुल चौधरी

Mukul Choudhary LSG vs KKR Record : ईडन गार्डन्सवर रंगलेल्या थरारामध्ये लखनौ सुपर जाएंट्सने केकेआरचा पराभव केला, पण या विजयाचा खरा शिल्पकार ठरला २१ वर्षीय मुकुल चौधरी. १८२ धावांचा पाठलाग करताना लखनौने १२८ धावांत ७ गडी गमावले होते. इथून लखनऊचा पराभव निश्चित मानला जात होता, परंतु मुकुलने आपल्या बॅटने आग ओकत केवळ २७ चेंडूंत नाबाद ५४ धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार खेचले. Mukul Choudhary
झुंझुनूचा मुलगा अन् २.६० कोटींची बोली – Mukul Choudhary
🎥 Watching a 𝙁𝙞𝙣𝙞𝙨𝙝𝙞𝙣𝙜 𝙈𝙖𝙨𝙩𝙚𝙧𝙘𝙡𝙖𝙨𝙨 right from the best seats in the house! 🤌
Mighty Mukul, take a bow 🫡#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/yt3HRTtutL
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातून येणारा मुकुल चौधरी (Mukul Choudhary ) उजव्या हाताचा यष्टीरक्षक-फलंदाज आहे. ६ ऑगस्ट २००४ रोजी जन्मलेला मुकुल घरगुती क्रिकेटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करतो. विशेष म्हणजे, ज्या अकादमीतून वेगवान गोलंदाज अशोक शर्मा (ज्याने २५४ किमी वेगाने गोलंदाजीचा दावा केला होता) बाहेर पडला, त्याच अकादमीत मुकुल तयार झाला आहे. सुरुवातीला तो स्वतः एक वेगवान गोलंदाज होता, मात्र नंतर त्याने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून नवी ओळख निर्माण केली. आयपीएल २०२६ च्या लिलावात लखनौने त्याला २.६० कोटी रुपयांना खरेदी केले होते.
सामन्यानंतर मुकुल चौधरी भावूक –
𝗔𝗕𝗦𝗢𝗟𝗨𝗧𝗘𝗟𝗬 𝗦𝗘𝗡𝗦𝗔𝗧𝗜𝗢𝗡𝗔𝗟 😮
One word for this knock?
Scorecard ▶️ https://t.co/ov5gAlAtPH #TATAIPL | #KhelBindaas | #KKRvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/euZOaEGtu2
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2026
सामन्यानंतर मुकुल म्हणाला, “माझा प्रवास खरंतर माझ्या जन्माआधीच सुरू झाला होता, कारण माझ्या वडिलांचे स्वप्न होते की एक दिवस त्यांचा मुलगा क्रिकेट खेळेल. पण त्यावेळी आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे मी लवकर सुरुवात करू शकलो नाही. मी साधारण १२-१३ वर्षांचा असताना खेळायला सुरुवात केली. त्यावेळी फारशा अकादमी नव्हत्या. सीकरमध्ये एसबीएस क्रिकेट अकादमी नावाची एकच अकादमी होती, जी नुकतीच सुरू झाली होती आणि मी तिथे सुमारे ५-६ वर्षे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मी जयपूरला गेलो, कारण जर तुम्हाला उच्च स्तरावर खेळायचे असेल, तर तुम्हाला पुढे जावेच लागते.”
हेही वाचा – KKR vs LSG : लखनौच्या २१ वर्षीय पठ्ठ्याने कोलकाताला रडवलं! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात KKR च्या तोंडचा घास हिरावला
ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाशी बरोबरी – Mukul Choudhary
या खेळीदरम्यान मुकुलने अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याने आवेश खानसोबत मिळून ८ व्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली, जी आयपीएल इतिहासातील या क्रमांकासाठीची सर्वात मोठी भागीदारी ठरली. तसेच, धावांचा पाठलाग करताना ७ व्या क्रमांकावर किंवा त्याखाली फलंदाजीला येऊन ७ षटकार मारण्याच्या ड्वेन ब्राव्होच्या (२०१८ मध्ये मुंबईविरुद्ध) विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.मुकुलचा टी-२० मधील अनुभव कमी असला तरी, त्याच्या १६४.७० च्या स्ट्राईक रेटने हे सिद्ध केले आहे की तो आगामी काळात आयपीएलचा मोठा ‘फिनिशर’ ठरू शकतो.





