डोर्लेवाडी – गेली काही दिवसापासून बारामती परिसरामध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
बारामतीमध्ये तापमान 38, 39 अंशावर गेले होते तर आज तापमानात वाढ होऊन आज बारामतीत तापमान हे 40 अंशावर गेल्याने उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली असल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाच्या तीव्रतेने बारामती शहरांमध्ये वाहतूक देखील मंदावली आहे. रस्ते काहीसे ओस पडल्याचे चित्र देखील दुपारच्यावेळी पाहायला मिळत आहे.
त्याचबरोबर थंडावा देणाऱ्या फळांना मागणी वाढली आहे. आईस्क्रीम, लिंबू, सरबत उसाचा रस अशा ठिकाणी थंड पेय पिण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.