Kenya Elephants Death : केनियातील १६ हत्तींचा विषबाधेमुळे दुर्दैवी मृत्यू
मरण पावलेल्या काही हत्तींच्या अवशेषांच्या तपासणीनंतर त्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले. विषारी फवारणी केलेले टोमॅटो खाण्यात आल्यामुळे हत्तींना ही विषबाधा झाल्याचा दावा केला जातो आहे.

Kenya Elephants Death – केनियातल्या अमबोसेली राष्ट्रीय उद्यानात गेल्या महिन्यात विषबाधेमुळे १६ हत्तींचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील काही हत्ती या राष्ट्रीय उद्यानात सायनाइडच्या विषबाधेमुळे मरण पावल्याचा संशय आहे.
मरण पावलेल्या काही हत्तींच्या अवशेषांच्या तपासणीनंतर त्यांना विषबाधा झाल्याचे आढळून आले. विषारी फवारणी केलेले टोमॅटो खाण्यात आल्यामुळे हत्तींना ही विषबाधा झाल्याचा दावा केला जातो आहे.
मात्र स्थानिक शेतकऱ्यांकडून हा दावा फेटाळला जातो आहे. हत्तींची शिकार कमी करून ३६ हजारांपेक्षा जास्त वाढवल्याबद्दल केनियाच्या वन्यजीव संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले जाते आहे.
अमबोसेली राष्ट्रीय उद्यानात महिन्याभराच्या काळामध्ये १५ हत्तींचा मृत्यू झाला आहे. हा आकडा शुक्रवारी वाढून १६ करण्यात आला. हत्तींच्या पोटात विषारी टोमॅटोचे अंश आढळून आले आहेत.
शेतकऱ्यांकडून फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांमध्ये घातक रसायने, अयोग्य साठवणूक किंवा अयोग्य पद्धतीने वापर झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. यासाठी पेस्ट कंट्रोल प्रॉडक्ट्स बोर्डकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
मृत्यूपुर्वी हत्तींचा श्वास कोंडला गेला असावा आणि त्यांना पक्षाघात झाल्याचे तपासणीत आढळून आले असल्यामुळे त्यांना सायनाइडची विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे.





