US Open 2024 : भारताच्या सुमित नागलचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात….

US Open 2024 : पुरुष एकेरी प्रकारात भारताचा सर्वोच्च मानांकित पुरुष टेनिसपटू सुमित नागल मंगळवारी नेदरलँड्सच्या टॅलोन ग्रीकस्पोरकडून पराभूत होऊन यूएस ओपनमधून बाहेर पडला आहे. नागलला त्याच्यापेक्षा सरस मानांकित खेळाडूविरुद्ध 6-1,6-3,7-6 असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, एका वर्षातील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या एकेरी स्पर्धेत भाग घेणारा नागल हा 2019 नंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्येही नागलला निराशेचा सामना करावा लागला होता. फ्रेंच खेळाडू कोरेंटिन माउटेट विरूध्द पराभूत झाल्यानंतर त्याला पहिल्या फेरीतूनच बाहेर पडावे लागले होते.
Test Cricket : कसोटीत परतणार विश्रांतीचा दिवस, ‘या’ दोन संघातील सामना 5 नव्हे 6 दिवसांचा होणार…
सुमित नागलने 2019 व 2020 नंतर युएस ओपन स्पर्धेच्या मुख्य फेरीत तिसऱ्यांदा प्रवेश केला होता. २७ वर्षीय खेळाडूचा हा हंगामात चांगले यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतून तर फ्रेंच व विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्या फेरीतूनच त्याला बाहेर पडावे लागले होते. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देखील फ्रांसच्या कॅरेटिन मॉन्टेटने त्याला पहिल्याच फेरीत पराभूत केले होते.
दरम्यान, यूएस ओपनमधील भारताच्या आशा अजूनही जिवंत आहेत कारण ,सुमित एकेरीत पराभूत झाला असला तरी देखील त्याचे दुहेरीतील आव्हान अजून कायम आहे. भारताचे रोहन बोपण्णा, युकी भांबरी, एन श्रीराम बालाजी व सुमित हे आपापल्या जोडीदारासह या स्पर्धेत उतरणार आहेत.





