Winston-Salem Open 2024 : पहिल्या फेरीतच सुमित नागलचे आव्हान संपुष्टात…

Winston-Salem Open 2024 :- भारताचा अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागलला एटीपी 250 विन्स्टन-सेलम ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सुमितला क्रोएशियाच्या बोर्ना कोरिक यांच्याकडून सरळ सेटमध्ये ४-६, २-६ असा पराभव स्वीकारावा लागला.
पहिल्या सेटपासूनच बोर्ना कोरिकने आघाडी घेतली होती. हा सेट बोर्ना कोरिकने ६-४ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सुमित पुनरागमन करेल असे वाटत असताना बोर्ना कोरिकने आपला खेळ उंचावताना दुसऱ्या सेट थेट ६-२ असा जिंकून लढतीवर अधिराज्य गाजविले.
दुहेरीमध्ये भारताचा राष्ट्रीय खेळाडू दक्षिणेश्वर सुरेश ब्रिटिश खेळाडू लुका पॉ यांच्यासह खेळणार आहे. यूएस कॉलेज सर्किटच्या पात्रता फेरीतच अमेरिकेच्या चौथ्या मानांकित लर्नर टिएनकडून ३-६, ४-६ असा पराभव झाल्याने दक्षिणेश्वरला एकेरीत स्थान मिळाले नव्हते.





