Olympic Council of Asia : रणधीर सिंग ओसीएच्या अध्यक्षपदी, हे पद भूषवणारे ठरले पहिले भारतीय…

Olympic Council of Asia President :- अनुभवी खेळ प्रशासक असणारे रणधीर सिंग हे आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिले अध्यक्ष आहेत. आशियाई संघटनेच्या 44 व्या सर्वसाधारण सभेत त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली.
पाच वेळा ऑलिम्पिक नेमबाज असलेले रणधीर सिंग हे एकमेव पात्र उमेदवार होते. रणधीर सिंग याचा कार्यकाळ हा चार वर्षांचा (2024-28) असणार आहे. कुशल प्रशासक असलेले 77 वर्षीय सिंग हे 2021 पासून आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष होते. कुवेतचे शेख अहमद अल-फहद अल-सबाह यांच्या जागी त्यांची निवड झाली आहे.
#WATCH | Randhir Singh, On being elected as the first Indian president of the Olympic Council of Asia (OCA) says, “The biggest thing is that all the bodies have been united…A lot of people don’t know that the Asian Games started in India…” pic.twitter.com/u2m8vmeauy
— ANI (@ANI) September 8, 2024
रणधीर सिंग यांचे कुटुंब पटियालाचे असून ते सुरुवातीपासून खेळांशी निगडित आहेत. सिंग याचे काका महाराजा यादवेंद्र सिंग भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) सदस्य होते.
तसेच त्याचे वडील भालिंदर सिंग हे देखील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होते. रणधीर सिंग हे सन 2001 ते 2014 या काळात आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक परिषदेचे सदस्यही होते. त्यानंतर ते मानद सदस्य म्हणून आयओसीशी संलग्न राहिले.





