Shanghai Masters 2024 : सुमित नागलचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का….

Shanghai Masters 2024 (Sumit Nagal) : भारतीय टेनिस स्टार सुमित नागलची खराब कामगिरी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेतही कायम राहिली आहे. बुधवारी शांघाय येथे नागलला शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने स्पर्धेतील त्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. त्याला चीनच्या वू यिबिंगकडून 6-3,6-3 असा पराभव स्विकारावा लागला.
स्वीडनविरुद्धच्या डेव्हिस चषक स्पर्धेत सहभागी होण्याबाबत एआयटीए सोबत वादानंतर सुमित नागल चर्चेत आला होता. 27 वर्षींय सुमितला चिनी खेळाडूने पराभूत केले. यापूर्वी यूएस ओपन स्पर्धेत देखील त्याला नेदरलँड्सच्या टॅलोन ग्रीकस्पूर पराभूत व्हावे लागले होते.
China Open 2024 : अल्काराजनं गाठली अंतिम फेरी, विजेतेपदासाठी समोर असणार सिन्नरचे आव्हान…
पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या सुमीतला यूएस ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतून बाहेर पडावे लागले. या स्पर्धेनंतर सुमितची ही पहिलीच स्पर्धा होती.





