Australian Open 2024 : मेलबर्नमध्ये मेदवेदेवचा विजयी धडाका कायम! उपांत्य फेरीत मारली धडक…

मेलबर्न – रशियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू डॅनियल मेदवेदेव याने या स्पर्धेच्या पुरुष एकेरीची उपांत्य फेरी थाटात गाठली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या ह्युबर्ट ह्युर्केजवर 7-6, 2-6, 6-3, 5-7, 6-4 अशी तब्बल पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत मात केली.
ह्युबर्टनेही मेदवेदेवच्या तोडीस तोड खेळ केला. त्याने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेत मेदवेदेवसारख्या अनुभवी खेळाडूला कडवी लढत दिली. अखेर त्याच्याकडून झालेल्या चुकांचा लाभ मेदवेदेवने घेतला व सामना जिंकला.
Paris 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा भारताचा मार्ग खडतर; जाणून घ्या नेमकं कारण….
महिलांच्या एकेरीतही सनसनाटी निकालाची नोंद
महिलांच्या एकेरीतही सनसनाटी निकालाची नोंद झाली. युक्रेनची बिगरमानांकित टेनिसपटू डायना यात्रेमस्का हीने कारकीर्दीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या महिला गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीने उपांत्यपूर्व फेरीत लिंडा नोस्कोव्हचा 6-3, 6-4 असा पराभव केला.





