US Open 2024 (Men’s) : मेदवेदेवचा पराभव करत सिन्नरची उपांत्य फेरीत धडक….

US Open 2024 : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या यानिक सिन्नरने बुधवारी येथे पुरुष एकेरीत माजी चॅम्पियन डॅनिल मेदवेदेवचा चार सेटमध्ये पराभव करून प्रथमच यूएस ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. इटलीच्या अव्वल मानांकित सिन्नरने 2021 च्या चॅम्पियन मेदवेदेवचा 6-2, 1-6, 6-1, 6-4 असा पराभव केला.
सेमीफायनलमध्ये (उपांत्य फेरी) सिन्नरसमोर ब्रिटनच्या 25व्या मानांकित जॅक ड्रॅपर (Jannik Sinner vs Jack Draper) याचे आव्हान असेल. हा सामना शनिवारी (7 सप्टेंबर) आर्थर ॲशे स्टेडियमवर होईल. याच दिवशी दुसरा उपांत्य सामना 12व्या मानांकित टेलर फ्रिट्झ आणि 20व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात होणार आहे.
बावीस वर्षीय ड्रॅपरने प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 2012 मध्ये अँडी मरेने ट्रॉफी जिंकल्यानंतर यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिला ब्रिटिश पुरुष खेळाडू ठरला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत 10व्या मानांकित ॲलेक्स डी मायनरचा 6-3, 7-5, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.
US Open 2024 : ‘एम्मा नवारो’ची उपांत्य फेरीत धडक, ‘या’ स्टार खेळाडूचे असणार आव्हान…
माजी जागतिक नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि कार्लोस अल्काराझ याचे खूप आधीच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने आता सिन्नर हा पुरुष एकेरीत एकमेव ग्रँडस्लॅम विजेता असा स्पर्धक शिल्लक आहे.





