Shanghai Masters 2024 : सिनर,अल्काराज अन् मेदवेदेवची आगेकूच कायम….

Shanghai Masters 2024 : शांघाय मास्टर्सच्या तिसऱ्या फेरीत अव्वल मानांकित खेळाडू यानिक सिन्नरने टॉमस मार्टिन एचेव्हरीविरुद्ध विजय मिळवत आगेकूच केली. सिन्नरने एचेव्हरीचा 6-7(3), 6-4, 6-2 पराभव करत चौथ्या फेरीत (राउंड आॅफ 16) धडक मारली आहे.
याआधी जॅनिक सिनरने शांघाय मास्टर्सच्या सलामीच्या सामन्यात तारो डॅनियलचा पराभव करून कारकिर्दीतील 205 वा विजय नोंदवला होता. 23 वर्षीय इटालियन खेळाडूला सुरुवातीच्या सेटमध्ये 37व्या मानांकित अर्जेंटिनाच्या खेळाडूने कडवी झुंज दिली. सिनरचा पुढील सामना 16व्या मानांकित बेन शेल्टन किंवा स्पेनच्या रॉबर्टो कार्बालेस बायना यांच्यातील विजेत्याशी होईल.
China Open 2024 : गॉफने पटकावले विजेतेपद, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी अमेरिकन खेळाडू….
अन्य लढतीत पाचव्या मानांकित डॅनिल मेदवेदेवनेही इटालियन खेळाडू मॅटेओ अर्नोल्डीविरुद्ध 5-7,6-4,6-4 असा विजय मिळवला. तर चायना ओपनचा विजेता आणि द्वितीय मानांकित खेळाडू कार्लोस अल्काराझने चीनच्या वू यिबिंगचा 7-6(5),6-3 असा पराभव केला. यासह मेदवेदेव आणि अल्काराझ यांनी देखील शांघाय मास्टर्सच्या चौथ्या फेरीत (राउंड आॅफ 16) धडक मारली आहे.





