Indian Wells Final 2026 : अल्काराझचा विजयी रथ मेदवेदेवने रोखला! जागतिक नंबर १ खेळाडूचा धुव्वा उडवत गाठली फायनल
Indian Wells Final 2026 : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेदवेदेवने स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ६-३, ७-६ (३) अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

Indian Wells Final 2026 Daniil Medvedev beat Carlos Alcaraz : इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवने धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मेदवेदेवने स्पेनच्या कार्लोस अल्काराझचा ६-३, ७-६ (३) अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. २०२६ या वर्षात सलग १६ सामने जिंकणाऱ्या अल्काराझचा हा या हंगामातील पहिलाच पराभव ठरला आहे.
बदला पूर्ण! मेदवेदेवची अचूक रणनीती –
२०२३ आणि २०२४ च्या इंडियन वेल्स फायनलमध्ये अल्काराझने मेदवेदेवला पराभूत केले होते. मात्र, यावेळेस मेदवेदेवने जुन्या पराभवाचा वचपा काढला. सुरुवातीपासूनच मेदवेदेवने आक्रमक पवित्रा घेतला. दुसऱ्या सेटमध्ये ४-५ अशा स्थितीत दोन सेट पॉईंट्सचा सामना करत असताना मेदवेदेवने कमालीचा संयम दाखवला आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेऊन विजय मिळवला. मेदवेदेवने आपल्या दुसऱ्या सर्व्हिसवर ७४ टक्के गुण जिंकत सामन्यावर पकड मिळवली.
२०२६ मधील तिसरी फायनल –
Это была лучшая игра от Даниила Медведева за последние несколько лет, а то и со времён US-Open 2021 и AO-2022.
Есть все шансы обыграть Синнера в финале в его нынешней форме.
Не в идеальной форме.Рад, что посмотрел до 3 ночи.#CarlosAlcaraz#DaniilMedvedev#IndianWells2026 pic.twitter.com/ITsu3m1QAu
— Дневник Крапивы (@karpzdes) March 15, 2026
३० वर्षीय मेदवेदेवचा २०२६ मधील हा टूर-लीडिंग १८ वा विजय आहे. या वर्षात तो तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी त्याने ब्रिस्बेन इंटरनॅशनल आणि दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. आता इंडियन वेल्समध्येही आपला परफेक्ट रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी तो सज्ज आहे.
यानिक सिनरशी होणार अंतिम लढत –
जेतेपदासाठी आता मेदवेदेवचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटलीच्या यानिक सिनरशी होणार आहे. सिनरने दुसऱ्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-२, ६-४ असा पराभव केला. इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत पोहोचणारा सिनर हा पहिला इटालियन खेळाडू ठरला आहे. त्यामुळे टेनिस चाहत्यांना आता मेदवेदेव विरुद्ध सिनर अशी हाय-व्होल्टेज फायनल पाहायला मिळणार आहे.





