नेवासा – नेवासा फाटा येथील डॉ.सुरेश झिंजुर्डे यांची अॅटीव्हा स्कुटी (क्रमांक एम.एच १७ सी.बी ९०८०) ही घराच्या पाठीमागे लावलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी सदरील स्कुटी चोरुन नेऊन पोबारा केल्याची घटना घडलेली आहे याबाबत झिंजुर्डे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की,डॉ.झिंजुर्डे हे पत्नी प्राथमिक शिक्षिका सुप्रिया,मुलगी स्वॉमिनी यांच्या बरोबर एकञ कुटूंबात राहतात त्यांची पत्नी शिक्षिका असल्यामुळे शाळेत जाण्या – येण्या करीता त्यांनी स्कुटी खरेदी केलेली होती सदरील स्कुटी (दि.७) रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी स्वामीनी हिने अॅटीव्हा स्कुटी त्यांच्या नेवासा फाटा येथील घराचे पाठीमागे लावली होती व तिने स्कुटीची चावी घरात ठेवुन दिलेली होती नंतर सकाळी (दि.८) रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुन्हा त्यांनी या स्कुटीची चावी घेवून घराचे पाठीमागे गेल्या असता त्यांना स्कुटी दिसली नाही.
त्यांनी आजुबाजुला स्कूटीचा शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे सदरील स्कुटीची चोरी झाल्याची खाञी झाल्यामुळे डॉ.झिंजुर्डे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे नेवासा फाटा येथे दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून पोलीसांना दुचाकी चोरांचे मोठे आव्हाण उभे राहीलेले असून दुचाकी चोरीचा तपास लावण्याची मागणी पोलीसांकडे केली आहे.