Ashadhi Ekadashi : राज्यातून लाखो भाविक पंढरीत; विठ्ठलाच्या दर्शनाची रांग पाच किलोमीटरपर्यंत
Ashadhi Ekadashi : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा आषाढी एकादशी सोहळा शनिवारी होत असून, राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत.

Ashadhi Ekadashi : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा आषाढी एकादशी सोहळा शनिवारी होत असून, राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. यामुळे देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे स्वेरी कॉलेजपर्यंत पोहोचली आहे. रांगेत हजारो भाविक थांबले असल्याने प्रत्येक भाविकाला देवाच्या दर्शनासाठी अंदाजे २० ते २४ तासांचा कालावधी लागत आहे. (Ashadhi Ekadashi)
आषाढी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन मंदिरे समितीने दर्शनरांगेतील भाविकांसाठी यंदा प्रथमच २० पत्राशेडची निर्मिती केली आहे. दर्शनरांगेत कायमस्वरूपी ४ व अतिरिक्त १६, अशा एकूण २० पत्राशेडची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व पत्रा शेडमध्ये भाविक रांगेत थांबले आहेत. (Ashadhi Ekadashi)
दर्शन रांगेतील भाविकांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर हे सतत दर्शन रांगेची पाहणी करत आहेत. दर्शनरांग शिस्तबद्ध व गतिमान झाली आहे, यामुळे भाविकांचा दर्शनरांगेतील प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व सुखकर होत आहे. (Ashadhi Ekadashi)
दर्शनरांगेत भाविकांच्या सोयीसाठी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे, दिशादर्शक व माहिती फलक, भक्तीसंगीतासाठी अत्याधुनिक ध्वनीप्रणाली, लाइव्ह दर्शनासाठी एलईडी व्हॅन व एलईडी टीव्ही, हरवले-सापडले केंद्र, फॅब्रिकेटेड शौचालये, जेटिंग व सक्शन मशिनद्वारे स्वच्छता व्यवस्था, आयसीयू व प्रथमोपचार केंद्र, पुरेसे वैद्यकीय कर्मचारी, सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली, विश्रांती कक्ष, बसण्याची व्यवस्था, आपत्कालीन मार्ग, अग्निशमन व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद केंद्र, अत्याधुनिक विद्युत व्यवस्था, तसेच फॅन व कुलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे मंदिर समितीचे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. (Ashadhi Ekadashi)
Ashadhi Ekadashi 2026 : मोठी बातमी! आषाढी वारीसाठी एसटीच्या ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार बस
Ashadhi Ekadashi : पंढरीच्या विठुरायाची स्वयंभू मूर्ती; प्राचीन-पौराणिक खुणांचा ऐतिहासिक ठेवा!





