Koynanagar News : कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांना पाणी टेकले; साठा ७२.६१ टीएमसीवर
Koynanagar News : कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणाच्या सहा वक्र दरवाजांना पाणी टेकले आहे.

Koynanagar News : कोयना धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून धरणाच्या सहा वक्र दरवाजांना पाणी टेकले आहे. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा ७२.६१ टीएमसीपर्यंत वाढला असून जिवंत साठाही समाधानकारक पातळीवर आहे. (Koynanagar News)
धरण भरतीच्या निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरणात ३२,०११ क्युसेक (सुमारे १.०४ टीएमसी) एवढी आवक सुरू आहे. आज कोयना येथे ४५ मिलीमीटर, नवजा येथे ८ मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे २१ मिलिमीटरम पावसाची नोंद झाली आहे. (Koynanagar News)
साधारणपणे ७३.५० टीएमसी पाणीसाठा झाल्यानंतर धरणाच्या सहा वक्र दरवाज्याला पाणी लागते. मात्र, सध्याच्या वाढत्या आवक आणि पाण्याच्या दाबामुळे ही पातळी जवळपास गाठली गेली असून दरवाज्याला पाणी टेकल्याचे स्पष्ट झाले आहे. (Koynanagar News)
दरम्यान, पावसाची अनियमितता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने पुढील आठवड्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरणे हेच सध्या प्रशासनाचे प्राधान्य आहे. (Koynanagar News)
सातारा सिंचन मंडळ व कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांनी सांगितले की, “धरणात येणारी आवक समाधानकारक आहे. पावसाची अनियमितता असली तरी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल, असा विश्वास आहे. सध्या पाणी सोडण्याचे कोणतेही नियोजन नाही.” (Koynanagar News)






