Koregaon Bhima News : नागरिक ठरले पोलिसांचे ‘खरे सहकारी’! ७ चोरटे जेरबंद; मदतगारांचा सत्कार करून शिक्रापूर पोलिसांची कृतज्ञता
Koregaon Bhima News : शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजारांमध्ये चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले आहे.

Koregaon Bhima News : शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजारांमध्ये चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. (Koregaon Bhima News)
सातत्यपूर्ण गस्त, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक नागरिकांच्या सतर्क सहकार्यामुळे सलग सात चोरट्यांना रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. या मोलाच्या योगदानाची दखल घेत शिक्रापूर पोलिसांनी मदत करणाऱ्या नागरिकांचा विशेष सत्कार केला. (Koregaon Bhima News)
आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेत होणाऱ्या मोबाईल, दागिने आणि रोकड चोरीच्या घटना रोखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. गस्तीदरम्यान ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सतत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले. (Koregaon Bhima News)
या मोहिमेचा परिणाम म्हणून शिक्रापूर आठवडा बाजारात सारिका राजू जाधव व साक्षी मेघराज पवार (रा. मांतरवाडी, हडपसर) या दोघींना चोरी करताना पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Koregaon Bhima News)
शिक्रापूर नंतर कोरेगाव भीमा आठवडा बाजारात जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद (रा. शिरूर) या दोघांनाही नागरिकांच्या माहितीच्या आधारे ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. (Koregaon Bhima News)
दरम्यान, आज पुन्हा कोरेगाव भीमा आठवडा बाजारात गस्त सुरू असताना मालन सहदेव पवार, रेखा गणेश दगडे आणि सायली कार्तिक दगडे (सर्व रा. वाघोली, ता. हवेली) या तीन महिलांना चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवायांमध्ये स्थानिक नागरिकांनी संशयितांची माहिती देणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि पोलिसांना तातडीने मदत करणे अशी महत्त्वाची भूमिका बजावली. (Koregaon Bhima News)
सुरेश भांडवलकर, दिनेश भोरे, साईनाथ शिनगारे सर्व राहणार कोरेगाव भीमा, सिकंदर शेख, रियाज शेख दोघे राहणार शिक्रापूर व इतर नागरिकांच्या कर्तव्यदक्षतेचा गौरव म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्यांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात आमंत्रित करून पुष्पगुच्छ देत सन्मानित केले. यावेळी गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, श्रावण गुपचे, विकास सरोदे, गणेश कुदळे हे उपस्थित होते. (Koregaon Bhima News)






