Sangli News : जत तालुक्यात तामिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत ३० लाखांची लूट
Sangli News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील भीवर्गी फाटा येथे मध्यरात्रीच्या सुमारास दरोड्याची एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक घटना घडली आहे.

Sangli News : जिल्ह्यातील जत तालुक्यातील भीवर्गी फाटा येथे तमिळनाडूतून माडग्याळच्या मेंढी बाजारात व्यापारासाठी आलेल्या तमिळनाडूच्या व्यापाऱ्यांवर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या सहा ते आठ दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत व्यापाऱ्यांकडील रोख रक्कम, सोने व मोबाइल असा सुमारे ३० लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून पलायन केले. (Sangli News)
मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूच्या सालेम येथून दहा व्यापारी मेंढी खरेदी- विक्रीच्या व्यवसायासाठी माडग्याळ येथील बाजाराकडे निघाले होते. पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान ते भीवर्गी फाट्याजवळ आले असता स्कॉर्पिओमधून आलेल्या दरोडेखोरांनी त्यांचा मार्ग अडवला. (Sangli News)
दरोडेखोरांनी व्यापाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील सुमारे २० लाख रुपयांची रक्कम, दोन तोळे सोने आणि मोबाइल असा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतला. त्यानंतर सर्व दरोडेखोर स्कॉर्पिओमधून पसार झाले. (Sangli News)
या घटनेने जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके संशयित दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. (Sangli News)
या प्रकरणाचा तपास सुरू असून, दरोडेखोर कोण होते आणि त्यांनी व्यापाऱ्यांचा नेमका कसा माग काढला, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली. (Sangli News)
Sangli News : सांगलीत साडेचार कोटींची ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त; दोघांना अटक
Sangli News : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सांगलीतील व्यावसायिकाला 2 कोटी 55 लाखांना गंडा






