Sangli News : सांगलीत साडेचार कोटींची ‘व्हेल माशाची उलटी’ जप्त; दोघांना अटक
कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील शक्ती पॉलिमर्स कंपनीच्या परिसरात (Sangli News) व्हेल माशाची उलटी अर्थात प्रतिबंधित अंबरग्रीस पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना सांगली ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

Sangli News : कसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील शक्ती पॉलिमर्स कंपनीच्या परिसरात (Sangli News) व्हेल माशाची उलटी अर्थात प्रतिबंधित अंबरग्रीस पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना सांगली ग्रामीण पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून अंदाजे ४ कोटी ५२ लाख १० हजार रुपये किमतीचा एकूण ४ किलो ५२१ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आकाराम सिद (वय ३२, रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि निखिल (पूर्ण नाव अज्ञात, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग) यांना याप्रकरणी अटक (Sangli News) करण्यात आली आहे. बागणवाडी रस्त्यावरील ग्रीन पार्क प्लॉटिंगजवळ हे दोघे प्रतिबंधित अंबरग्रीस पदार्थाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना शनिवारी (दि. २९) रात्री नऊच्या सुमारास मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटरसायकलसह (एमएच ०९ एफझेड ७२६९) अंबरग्रिस जप्त करण्यात आले. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ३९, ४३, ४४, ४६, ५१ अन्वये सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २४९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.हवालदार महेश भूपाल जाधव यांनी फिर्याद दिली.
संशयित अमोल सिद याला काल दि. ३० रोजी दुपारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दि. ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरा संशयित निखिल याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या (Sangli News) मार्गदर्शनाखाली मिरज विभागाचे उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी देशमुख, अरुण औताडे, पोलीस हवालदार सचिन खाडे, महेश जाधव, अभिजित पाटील, कॉन्स्टेबल हिम्मत शेख, योगेश यादव, अमित पाटील तसेच वन विभागाचे कर्मचारी गणेश बबनराव भोसले, सुधीर वसंत सोनवले यांचा सहभाग होता.






