Sangli News : शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सांगलीतील व्यावसायिकाला 2 कोटी 55 लाखांना गंडा
सांगलीत (Sangli News) सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आ ली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका 45 वर्षीय व्यावसायिकाची तब्बल 2 कोटी 55 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.

Sangli News : सांगलीत (Sangli News) सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आ ली आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका 45 वर्षीय व्यावसायिकाची तब्बल 2 कोटी 55 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे.
विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या या व्यावसायिकाशी अज्ञात व्यक्तींनी मोबाइलद्वारे संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक (Sangli News) केल्यास अल्पावधीत मोठा परतावा मिळेल, असा विश्वास संपादन करत आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वेळोवेळी पैसे जमा करण्यास सांगितले. नफ्याच्या आशेने व्यावसायिकाने टप्प्याटप्प्याने तब्बल दोन कोटी ५५ लाख ५० हजार रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये जमा केले.
मात्र, गुंतवणुकीवर कोणताही परतावा मिळाला नाही, तसेच जमा केलेली रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सांगली (Sangli News) शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत अधिक तपास करत आहेत.






