Wagholi Crime News : वाघोलीत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार; परिसरात खळबळ
Wagholi Crime News : वाघोली परिसरात लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Wagholi Crime News : वाघोली परिसरात एका ४५ वर्षीय व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. लग्नाचे खोटे आमिष दाखवून युवतीवर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष हिरामण सातव (वय ४५, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) यांच्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wagholi Crime News)
तक्रारीनुसार, २ एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून संबंधित युवतीला आळंदी येथे नेले. तेथे आपण तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणार असल्याचे सांगून विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. (Wagholi Crime News)
त्यानंतर युवतीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. (Wagholi Crime News)
या तक्रारीनंतर वाघोली पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात लैंगिक अत्याचारासह तक्रारीत नमूद केलेल्या आरोपांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Wagholi Crime News)
दरम्यान, आरोपी हा वाघोली परिसरातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय असल्याची स्थानिक पातळीवर चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणाची परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. (Wagholi Crime News)
या प्रकरणात काही राजकीय व्यक्ती किंवा प्रभावशाली मंडळी हस्तक्षेप करत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत असली, तरी त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे आता लक्ष लागले आहे. (Wagholi Crime News)
Wagholi News : पिंपरी सांडस परिसरात देशी बनावटीचे पिस्टल जप्त; दोघांवर लोणीकंद पोलिसांची कारवाई





