Bhavaninagar News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भवानीनगरमध्ये पोलिसांचा रूट मार्च
Bhavaninagar News : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज (दि. ११) भवानीनगर येथे रूट मार्च काढण्यात आला.

Bhavaninagar News : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने आज (दि. ११) भवानीनगर येथे रूट मार्च काढण्यात आला. तसेच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोर दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. (Bhavaninagar News)
सकाळी ११ वाजता भवानीनगर येथील मुख्य बाजारपेठेतून या रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, या उद्देशाने पोलिसांकडून हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. (Bhavaninagar News)
रूट मार्चमध्ये चार पोलीस अधिकारी आणि ५२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी दंगा अथवा कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सादर केले. याबाबतची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. (Bhavaninagar News)





