Arjun Tendulkar Idol : सचिन-विराट नव्हे तर, ;हा’ खेळाडू आहे अर्जुन तेंडुलकरचा आयडॉल; स्वत:च केला खुलासा, पाहा VIDEO
Arjun Tendulkar Idol : महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा असूनही, अर्जुनने आपल्या बॅटिंग आयडलबद्दल बोलताना वडिलांचे नाव न घेता सर्वांनाच चकित केले आहे.

Who is Arjun Tendulkar Batting Idol : आयपीएल २०२६ च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झालेला अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर सध्या एका खळबळजनक खुलाशामुळे चर्चेत आला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा असूनही, अर्जुनने आपल्या बॅटिंग आयडलबद्दल बोलताना वडिलांचे नाव न घेता सर्वांनाच चकित केले आहे.
क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा वारसा चालवणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने एका पॉडकास्टमध्ये आपल्या मनातील सुप्त इच्छा आणि आवडीनिवडी स्पष्टपणे मांडल्या. जेव्हा त्याला त्याच्या फलंदाजीच्या आदर्शबद्दल (Batting Idol) विचारण्यात आले, तेव्हा त्याने सचिन तेंडुलकर ऐवजी ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग याचे नाव घेतले. युवराजचा निधड्या छातीचा खेळ आणि त्याची बॅटिंग स्टाईल आपल्याला प्रचंड आवडते, असे अर्जुनने यावेळी सांगितले.
मुंबईची साथ सोडली, आता लखनऊची ओढ
Live your life honestly, keep yourself happy, don’t hurt anyone and never commit fraud.”
Arjun Tendulkar ❤️
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) April 1, 2026
आयपीएल २०२६ च्या सुरुवातीलाच अर्जुनच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने त्याला शार्दुल ठाकूरच्या बदल्यात लखनऊ सुपर जायंट्सकडे ट्रेड केले आहे. मुंबईच्या संघात सतत बेंचवर बसून राहावे लागल्याबद्दल अर्जुनने आपली खंत व्यक्त केली. तो म्हणाला, “कोणत्याही खेळाडूला बेंचवर बसायला आवडत नाही. मुंबईत स्पर्धा इतकी जास्त होती की मला पुरेसे सामने मिळत नव्हते. त्यामुळेच मी आधी गोवा संघात जाण्याचा आणि आता लखनऊकडून खेळण्याचा निर्णय घेतला.”
नव्या भूमिकेत अर्जुनचा जलवा?
Arjun Tendulkar chose to play for Goa because he knew that staying with Mumbai would bring constant scrutiny. If he failed or even got selected, people would quickly label it as nepotism due to being Sachin Tendulkar’s son. pic.twitter.com/4pmwuoYdwH
— Saurabh 🏏 (@MR_CricAnalyst) April 1, 2026
अर्जुन सध्या लखनऊच्या कोचिंग स्टाफसोबत जोरदार सराव करत असून, आपल्या स्विंग गोलंदाजीने दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना चकमा देण्याच्या तयारीत आहे. “खेळाडूच्या हातात फक्त मेहनत करणे असते, जेणेकरून जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिचे सोने करता येईल,” असे अर्जुनने बेधडकपणे सांगितले. दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात लखनऊचा कर्णधार त्याला प्लेइंग-११ मध्ये स्थान देतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





