BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला आजपासून सुरुवात झाली. भारताने प्रथम फलंदाजी करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ गडी गमावून २७८ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर ८२ धावांवर नाबाद आहे. ११२ धावसंख्येवर भारतीय संघाने ४ गडी गमावले होते. मात्र, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांनी संघाला सावरले. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि चेतेश्वर पुजारा यांनी ५व्या गड्यासाठी १४९ धावांची दमदार भागीदारी करत टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले.
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
चेतेश्वर पुजारा ९० दहावंवर खेळात असताना शतकाच्या अत्यंत जवळ जाऊन बाद झाला. बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने पुजाराला बाद करून भारतीय संघाला मोठा धक्का दिला. पुजारा आणि अय्यर यांच्या भागीदारीमुळे भारतीय संघाला चांगली मजबुती मिळाली होती. मात्र पुजारा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या अक्षर पटेलने दिसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर १४ धावांवरच आपली विकेट गमावली.
“धोनी माझा आदर्श असून मला त्याला अजूनही…”, रिचाने व्यक्त केली इच्छा
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झालेली असल्याने या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपवण्यात आलेले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात शुबमन गिल आणि राहुल सलामीला उतरले होते. मात्र सलामीला आलेले गिल (२० धावा), राहुल (२० धावा) आणि चौथ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली (१ धाव) हे झटपट बाद झाले. रिषभ पंत याने जलद फलंदाजी करण्याच्या नादात ४६ धावांवर आपली विकेट गमावली. मात्र, यादरम्यान त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५० षटकार मारण्याचा विक्रम नावावर केला.
Stumps on Day 1⃣ of the first #BANvIND Test!@ShreyasIyer15 remains unbeaten on 8⃣2⃣* as #TeamIndia reach 278/6 at the end of day’s play 👌
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44N7IRe pic.twitter.com/muGIlGUbNE
— BCCI (@BCCI) December 14, 2022
भारतीय संघ
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
बांगलादेश संघ
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, इबादत हुसेन.