नगर, (प्रतिनिधी)- महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सर्व २४ विषयांना प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी मंजुरी दिली. प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होती. सर्व प्रमुख अधिकारी व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
प्रशासकीय स्तरावर आयुक्तांनी गठीत केलेल्या समितीने प्रस्ताव छाननी करून समितीकडे सादर केले होते. बुधवारी सकाळी ११ वाजता स्थायी समितीची बैठक पार पडली.
यात अग्निशमन सेवेत फी वाढ करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन दंडात्मक रकमेत वाढ सेवा कारमध्ये वाढ सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे कचरा टाकणे दंडात दुप्पटीने दर वाढले आहेत. सेप्टी टॅंक दर आता ५००चे १२००झाले आहेत तसेच सत्य प्रचिती फी ५०रुपयांनी वाढली आहे. जॉगिंग ट्रॅक भाड्याने देणे कर दरवाढ २००० चे १०००० केले आहेत. यासह इतर सर्व विषय मंजूर करण्यात आले.