Youths Die : धक्कादायक..! बहिण भावासह चौघांवर काळाचा घाला, तलावात बुडून चार जणांचा मृत्यू
Youths Die : अमरावतीतील धातखेडा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.

Youths Die : अमरावती जिल्ह्यातील धातखेडा तलावात रविवारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पोहण्यासाठी गेलेल्या चार जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन बहिण-भावांचाही समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Youths Die)
मृतांमध्ये सोनाली नरेंद्र जोशी (वय १६), आदित्य नरेंद्र जोशी (वय १२), पायल बबलू पंडित (वय २१) आणि यश गजानन काकणे (वय १३) यांचा समावेश आहे. हे चौघेही अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Youths Die)
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या धातखेडा बंधाऱ्यात हे सर्वजण पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Youths Die)
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती शोध व बचाव पथक (DRF) देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. (Youths Die)
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील बहिण-भावासह चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (Youths Die)





