Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! ‘विकसित भारत संकल्प सभे’ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा
ज्यांनी मला पाडले त्यांनी मला उभ राहायला शिकवले. ज्यांनी साथ दिली त्यांनी मला विश्वासाची शक्ती दाखवली. ज्यांनी विरोध केला त्यांनी मला लोकशाहीची शक्ती समजावली. प्रत्येक संकट माझ्या धैर्याची परिक्षा घेत होती.

Narendra Modi – ज्यांनी मला जिंकवले त्यांनी मला विनम्र व्हायला शिकवले. ज्यांनी मला पाडले त्यांनी मला उभ राहायला शिकवले. ज्यांनी साथ दिली त्यांनी मला विश्वासाची शक्ती दाखवली. ज्यांनी विरोध केला त्यांनी मला लोकशाहीची शक्ती समजावली. प्रत्येक संकट माझ्या धैर्याची परिक्षा घेत होती.
प्रत्येक सिद्धीने मला मोठ्या लक्षापर्यंत जाण्याचे सामर्थ्य दिले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. जे काम हाती घेतले ते आपण करणारच आहोत, आपण करूनच दाखवू असे सांगतानाच मोदींनी वूई विल डू इट… वूई विल डू इटचा नाराही दिला. आपण विकसित भारत करणार आहोत, वई विल डू इट… अशा घोषणाही त्यांनी दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकारांचे प्रमुख आणि शासन आणि लोकसेवेला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या निमित्ताने मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला. माझ्या आयुष्यातील कोणतीही घटना वाया गेली नाही. प्रत्येक घटनेने मला काही ना काही शिकवले.
भूजच्या भूकंपाने मला पुनर्निमाणासाठी उभे राहायला शिकवले. चांद्रयानने मला अपयशातून उंच उडायला शिकवले. करोनाने मला राष्ट्राच्या सामूहिक चेतनेचे महत्त्व शिकवले. मीडियाने मला चांगले वाईट अनुभवातून पुढे जायला शिकवले. प्रत्येक गोष्टीतून मला शिकता आले. गरीबांनी मला साधन संसाधन मर्यादित असले तरी स्वप्न मोठी असली पाहिजे हे शिकवले. निर्धार मोठा असला पाहिजे हे शिकवले, असे ते म्हणाले.
कोट
भारताला आता थांबण्याचे काहीच कारण नाही. शंभर वर्षांपूर्वी आपली लोकसंख्या ४० कोटींपेक्षाही कमी होती. आज आपण १४० कोटींहून अधिक आहोत. हे १४० कोटी नागरिक मिळून २०४७ पर्यंत विकसित भारताची निर्मिती करतील आणि आपण ते नक्की करूनच दाखवू.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान






