Sharad Pawar : शरद पवारांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; केली ‘ही’ मागणी
Sharad Pawar : विकास लवांडे यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

Sharad Pawar : काल ९ मे या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर विकास लवांडे यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली.
किर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी आळंदी परिसरात लवांडे यांना गाठत त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. तसेच त्यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विकास लवांडे यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही नेत्यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या कृतीचे समर्थन केले आहे.
तर काहींनी निषेध नोंदवला आहे. या घटनेनंतर विकास लवांडे यांनी शरद पवारांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतली. या भेटीत त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा घटनाक्रम सांगितला.
यानंतर शरद पवारांनी थेट पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याची आणि विकास लवांडे यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली.
ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण @PawarSpeaks साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक… pic.twitter.com/b7EBla23xG
— Vikas Lawande (@VikasLawande1) May 10, 2026
याबाबत स्वतः विकास लवांडे यांनी एक्सवरुन ट्वीट करत शरद पवारांची भेट घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण
शरद पवार साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याची आणि मला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली, असे ट्वीटमध्ये विकास लवांडे यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असून त्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे साहेबांनी मला सांगितले. तसेच हा वैचारिक तात्विक पातळीवरचा लढा असाच सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने चालू ठेवावा विचारांची लढाई विचारांनी आपण लढत राहू असे साहेबांनी मला आशीर्वाद देताना सांगितले, अशी माहिती लवांडेंनी पोस्टद्वारे दिली आहे.
हेही वाचा : Kriti Sanon : “अनेक भूमिका नंतर स्टारकिड्सना दिल्या”; कृती सेनॉनचे इंडस्ट्रीतील नेपोटिझमवर भाष्य





