Aravinda de Silva : मोठी बातमी! श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात आढळला मृतदेह; क्रिकेट विश्वात उडाली खळबळ
Aravinda de Silva : कपिला चंद्रसेना हे डी सिल्वा यांचे जवळचे नातेवाईक असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Aravinda de Silva’s home Kapila Chandrasena found dead : श्रीलंकेचे महान क्रिकेटपटू आणि १९९६ च्या विश्वचषक विजयाचे नायक अरविंद डी सिल्वा यांच्या घरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अरविंद डी सिल्वा यांच्या निवासस्थानी श्रीलंका एअरलाईन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कपिला चंद्रसेना यांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. चंद्रसेना हे डी सिल्वा यांचे जवळचे नातेवाईक असून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
भ्रष्टाचाराचा खटला आणि अटक वॉरंटचे सावट –
मिळालेल्या माहितीनुसार, कपिला चंद्रसेना यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. २.३ अब्ज डॉलर्सच्या एका मोठ्या व्यवहारात अनियमितता केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला सुरू होता. एका बनावट कंपनीच्या माध्यमातून २० लाख डॉलर्सची लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणी कोलंबोच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. हे वॉरंट जारी झाल्यापासून चंद्रसेना तणावाखाली होते. ७ मे रोजी ते अरविंद डी सिल्वा यांच्या घरी गेले आणि तिथेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.
Kapila Chandrasena found dead at cricketer Aravinda de Silva’s residence
Read more 👉 https://t.co/rzDF7BTOkU pic.twitter.com/SyUFfkrmzo— DailyMirror (@Dailymirror_SL) May 8, 2026
विश्वचषक हिरो अरविंद डी सिल्वा यांची कारकीर्द –
More details revealed on death of former SriLankan Airlines CEO Kapila Chandrasena pic.twitter.com/7mUynhWtNj
— Ada Derana (@adaderana) May 8, 2026
ज्या घरामध्ये ही घटना घडली, ते घर श्रीलंकेचे दिग्गज फलंदाज अरविंद डी सिल्वा यांचे आहे. डी सिल्वा यांनी ९३ कसोटीत ६,३६१ धावा आणि ३०८ एकदिवसीय सामन्यात ९,२८४ धावा केल्या आहेत. १९९६ च्या विश्वचषकात त्यांनी ४४८ धावा कुटत श्रीलंकेला विश्वविजेते बनवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. विशेषतः अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १०७ धावांची त्यांची खेळी आजही क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात आहे.
एका महान खेळाडूच्या घरी देशातील एका मोठ्या कंपनीच्या माजी सीईओचा मृतदेह सापडल्याने श्रीलंका पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे क्रिकेट विश्वासह कॉर्पोरेट जगतातही मोठी चर्चा रंगली आहे.





