Amol kolhe : “मी त्यांना हात जोडून आव्हान करतो की, ; अजित पवारांना आता अमोल कोल्हेंचे चॅलेंज

Amol kolhe : दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविषयी विधान करताना त्यांच्या विरोधात उभा केलेला उमेदवार निवडून आणणारच असे म्हटले होते त्यासोबतच अमोल कोल्हे यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, अजित पवारांनी हे आव्हानदेखील दिले होते. दरम्यान, आता अजित पवारांचे हे आव्हान अमोल कोल्हेनी स्वीकारले आहे.त्याउलट आता अजितदादांनी माझं आव्हान स्वीकारावं, अशी विनंती खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल कोल्हे यांनी, सरकार सोडवू न शकलेल्या समस्या मी शेतकरी आक्रोश मोर्चातून मांडतोय. त्यामुळं अजित दादांची चिडचिड होतेय का? हे तुम्ही त्यांनाच विचारा. असे कोल्हे म्हणाले. तसेच बारामती विधानसभेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा ही वाचला. सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना, “मी त्यांना हात जोडून आव्हान करतो की, त्यांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावं. कारण सत्ता संघर्षावेळी जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेत गेल्याचं ते म्हणाले. ते मंत्री झाल्यावर त्यांचं जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत झालं. पण आता मात्र त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला. म्हणूनच आज शेतकरी मला कांदा, खर्डा-भाकरी देऊन साधपणाने स्वागत करतायेत अन त्यांचे प्रश्न मांडायला साथ देतायेत, असे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.
सातत्यानं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातायेत. जपान मधून ट्विट करत 2410 रुपयांचा दर देऊन कांदा खरेदी करणार, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. मग दिल्ली वारी करता त्यावेळी फक्त सत्ता संघर्ष, मंत्री पदाचा विस्तार याबाबत त्यांच्याशी बोलता. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गप्प का बसतात, असे कोल्हे म्हणाले. त्यासोबतच मोर्चा संपल्यावर मी नक्कीच अजित दादांची भेट घेणार. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न सविस्तरपणे मांडणार आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.





