Supriya Sule: “आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार”; पुण्यातील जमावबंदीच्या आदेशावरुन सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Supriya Sule : पुणे शहरात पुढील १४ दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’लागू

Supriya Sule: पुणे शहरात आजपासून पुढील १४ दिवसांसाठी ‘जमावबंदीचे आदेश’लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने आणि सभा घेण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. जमावबंदीच्या आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. (Supriya Sule)
सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत लिहिले की, “पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी/प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे.
Box Office Collection : ‘देऊळ बंद 2’चा बॅाक्स अॅाफिसवर दबदबा! पाच दिवसांच्या कमाईचे आकडे पाहा
या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. (Supriya Sule)
शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत”.
“कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत? पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत.
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले…
— Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026
जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे,” असंही पुढे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, जमावबंदीच्या आदेशानुसार, मोर्चे, मिरवणुका, सभा बंद करता येतात. सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या जमावावर निर्बंध घातले जातात हा आदेश 26 मे रोजी रात्री 1 वाजल्यापासून 8 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत लागू असेल असं सांगण्यात आलं आहे. Supriya Sule
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतीवर बंदी (Supriya Sule)
या आदेशानुसार नुसार शस्त्रे बाळगणे दगड, स्फोटके, लाठ्या ठेवणे, भडकाऊ घोषणा, गाणी, भाषणे, सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृती यावर बंदी लागू करता येते.
जर एखाद्या व्यक्तीने वरील बंदीचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या तर, पोलीस त्या वस्तू जप्त करू शकतात संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते.
हेही वाचा:
Akshay Kumar : अक्षय कुमार भोजपुरी अंदाजात; ‘घिस घिस घिस’ गाण्यामुळे ट्रोल





