आळंदी : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये घेण्यात आलेल्या एच. एस. सी. परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने घवघवीत यश मिळविले. यामध्ये कॉमर्स शाखेचा निकाल ९८.१९% व आर्ट्स शाखेचा निकाल ८९.७७% लागला.
कॉमर्स शाखेमध्ये एकूण १११ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात १०९ विद्यार्थी पात्र ठरले. यामध्ये साक्षी अर्जुनसिंग गहिरवार या विद्यार्थिनीने ५३९/६०० (८९.८३%) गुण मिळवून प्रथम, वैष्णवी अभिमान दुनघव या विद्यार्थिनीने ५०८/६०० (८४.६७%) गुण मिळवून द्वितीय तर प्रीती सुनील गालफाडे या विद्यार्थिनीने ४८८/६०० (८१.३३%) गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तसेच आर्ट्स शाखेमध्ये एकूण ८८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यात ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये कल्याणी दिनेश भिसे या विद्यार्थिनीने ४७२/६०० (७८.६७) गुण मिळवून प्रथम, वैष्णवी परशुराम तावरे या विद्यार्थिनीने ४६२/६०० (७७.००%) गुण मिळवून द्वितीय तर पूजा परमेश्वर कोळी या विद्यार्थिनीने ४५७/६०० (७६.१७%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
या सर्व गुणी व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.