Fraud Case : अकोल्यात खळबळ! बनावट आधार कार्ड वापरून शेतजमीनीची विक्री; दोघांना अटक
Fraud Case : बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि तोतया मालक उभा करून शेतजमिनीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा अकोला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

Fraud Case : अकोला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बनावट कागदपत्रांचा वापर करून शेतजमीन विकल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्याबाहेरील एका कुटुंबाने जमीन खरेदी करण्यासाठी गोपाळ अग्रवाल आणि शिवशंकर परिहार या दोघांशी व्यवहार केला होता. (Fraud Case)
परिहार याने स्वतःला अरविंद ढेठे (जे बाळापूर तालुक्यातील निमकर्डा भागातील त्या जमिनीचे खरे मालक आहेत) असल्याचे भासवले आणि आधार कार्डही सादर केले. २४ जून रोजी बाळापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात विक्री कराराची नोंदणी होत असताना या कथित मालकाचे ठसे आधार नोंदींशी जुळले नाहीत. (Fraud Case)
त्यानंतर शाईने घेतलेल्या अंगठ्याच्या ठशाचा वापर करून नोंदणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर खरेदीदाराने आरोपींना ६ लाख आणि ५ लाख रुपयांचे धनादेश (चेक) दिले. मात्र, ठसे न जुळल्याच्या प्रकारानंतर खरेदीदाराला संशय आला. (Fraud Case)
Digital fraud : डिजिटल फसवणुकीच्या दरात घट, पण भारतीयांचे आर्थिक नुकसान जागतिक सरासरीपेक्षा 36% अधिक
चौकशी केली असता, त्याला सांगण्यात आले की, तो मालक ढेठे यांच्यासारखा दिसत नव्हता. त्यानंतर खरेदीदाराने मूळ मालकाशी संपर्क साधला आणि त्यांनी ही फसवणूक असल्याचे स्पष्ट केले. (Fraud Case)
ढेठे यांच्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अग्रवाल आणि परिहार यांना बनावटगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. न्यायालयाने या दोघांना २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Fraud Case)
दरम्यान, आधआर प्रणालीने परिहारचे ठसे नाकारूनही नोंदणी कशी पूर्ण झाली, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ढेठे यांनी सांगितले. सरकारी विभागाने ही फसवणूक सुरुवातीलाच का रोखली नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (Fraud Case)
Daund Crime: दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; एकावर गुन्हा






