Gadchiroli Accident | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता सुशील हिंगे (५३) यांचा रविवारी मध्यरात्री भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांचे पती सुशील हिंगे (५७) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. गडचिरोली-नागपूर महामार्गावरील उमरेड तालुक्यातील पाचगावजवळ हा अपघात घडला आहे. हिंगे दाम्पत्य नागपूर येथील काम आटोपल्यानंतर मुलांना भेटून रात्री उशिरा आपल्या कारने गडचिरोलीकडे परतत होते. रविवारी रात्री उशिरा 12:30 वाजता पाचगाव जवळून जात असताना दुभाजक ओलांडत आलेल्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या कारला मागून धडक दिली. धडकेत मधल्या सीटवर बसलेल्या गीताताईंच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सुशील हिंगे आणि वाहनचालक हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Gadchiroli Accident | भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश भाजपमध्ये महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा, जिल्हा महामंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवली. नगरपालिका निवडणुकीतील नाराजीनाट्यानंतर भाजपला रामराम करत त्यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मित्रपक्ष राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. प्रवेश होताच त्यांची निवड महिला प्रदेश उपाध्यक्षपदी झाली. Gadchiroli Accident | कोरोना काळात मदत गीता हिंगे यांनी आधार विश्व फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना काळात शेकडो रुग्णांसाठी घरगुती अन्नाचे डबे पोहोचवले. तसेच मृतांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी त्यांनी उचलली. विधवांसाठी मकरसंक्रातीला हळदी-कुंकू कार्यक्रम राबवत समाजापुढे आदर्श घालून दिला. Gadchiroli Accident | गीता हिंगे यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी 5 वाजता कठाणी नदी तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गीता हिंगे यांच्या निधनाने गडचिरोलीसह राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. Gadchiroli Accident | हेही वाचा: सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; “कुंभमेळा झाला पाहिजे त्याबाबत आदरच, पण…”