निराश होऊन हिम्मत हारू नका
\nपुढे बोलताना,”सोडतीमध्ये घर मिळाले नाही म्हणून नाराज झाले तरी चालेल परंतु निराश मात्र होऊ नका, निराशा वाईट असते. निराश होऊन हिम्मत हारू नका असे आवाहनही अजित पवार यांनी लाभार्थ्यांना केले. तसेच निर्व्यसनी रहा, घर मिळाले नाही म्हणून पैसे उधळत बसू नका, चौफुला, टेंभुर्णीला जाऊ नका असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा उडाला. पैसे साठवा, त्यात भर घाला. घराचे स्वप्न एक दिवस पूर्ण होईल, असेही अजित पवार म्हणाले.
\nघराचा ताबा तत्काळ देण्याची सूचना
\nतसेच “सोडत पारदर्शक आहे. एकाही माणसाचा हस्तक्षेप नाही. त्यामुळे गैरप्रकार होण्याची कोणतीही संधी नाही. कोणताही दलाल महापालिकेने नेमला नाही. नंबर काढून देतो म्हणणाऱ्यांची तक्रार करा, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, अशा शहाण्यांना सोडणार नाही. साला म्हणणार होतो पण नको शहाणाचा म्हणतो असे सांगत अजित पवार यांनी घराचा ताबा तत्काळ देण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली.”