Mohammad Shami : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीची का नाही निवड? अजित आगरकरांनी सांगितलं कारण

Ajit Agarkar reveals Mohammad Shami’s absence : आयपीएल २०२५ चा हंगाम संपल्यानंतर लवकरच भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे २० जूनपासून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली १८ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान मिळाले नाही. दरम्यान, संघ जाहीर केल्यानंतर निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरांनी शमीची निवड न करण्या मागचे कारण सांगितले.
मोहम्मद शमीबद्दल अजित आगरकर काय म्हणाले?
अजित आगरकर म्हणाले की मोहम्मद शमीला अलिकडेच दुखापत झाली आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे आणि कामाच्या ताणामुळे तो संघाचा भाग नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना पत्रकार परिषदेत निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर म्हणाले, “मोहम्मद शमीवर कार्यभार अपेक्षेपेक्षा कमी आहे. आम्हाला वाटलं होतं की तो उपलब्ध असेल, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. त्यांचं एमआरआय झालं आणि काही नवीन बाबी समोर आल्या . सध्या तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही.”
दोन वर्षांपासून मोहम्मद शमी कसोटी संघातून गायब –
BCCI chief selector Ajit Agarkar has confirmed that Mohammad Shami has been ruled out of the England Test series by the Indian cricket medical team due to injury.#BCCI #MohammadShami #AjitAgarkar #INDvsENG #CricketTwitter pic.twitter.com/Se1ONqGcri
— InsideSport (@InsideSportIND) May 24, 2025
मोहम्मद शमी बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघाबाहेर आहेत. त्यानी शेवटचा कसोटी सामना जून २०२३ मध्ये भारतासाठी खेळला होता, जो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चा अंतिम सामना होता. त्यानंतर आता दोन वर्षे उलटली असून तो कसोटी संघातून बाहेर आहे. दुखापतीमुळे जवळजवळ १४ महिने टीम इंडियातून बाहेर राहिल्यानंतर, शमी या वर्षी जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला, परंतु तो आतापर्यंत चेंडूने काही खास कामगिरी करू शकलेला नाही. २०२५ च्या आयपीएलमध्ये शमी खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्याने या हंगामात नऊ सामन्यांमध्ये फक्त सहा विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Shubman Gill : शुबमन गिलने कर्णधार होताच केला अनोखा पराक्रम! ‘या’ खास यादीत पटकावले पाचवे स्थान
इंग्लंड दौऱ्यासाठीचा भारताचा कसोटी संघ :
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.





