Mohammed Shami Record : मोहम्मद शमीची कमाल! पहिल्याच चेंडूवर विकेट घेत रचला रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणार एकमेव गोलंदाज
Mohammed Shami Record : लखनौसाठी पदार्पण करताना शमीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आयपीएलच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे.

Mohammed Shami Record First Ball Wicket in IPL : आयपीएल २०२६ च्या पाचव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने असताना, भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. लखनौसाठी पदार्पण करताना शमीने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत आयपीएलच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे.
लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मोहम्मद शमीने आपल्या गोलंदाजीने दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. १४२ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलेल्या शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद करून त्याला ‘गोल्डन डक’ची चव चाखायला लावली. या एका विकेटसह शमीने आयपीएलमध्ये असा पराक्रम केला आहे, जो आजवर ट्रेंट बोल्ट किंवा मलिंगा सारख्या दिग्गजांनाही जमला नाही.
पहिली ओव्हर अन् शमीचा ‘विराट’ विक्रम –
Mohammed Shami has now taken a wicket on the first ball of an IPL innings on five occasions (Including once after starting with a wide).
No other bowler has done it more than three times in the IPL 🔥.
Credit to @ESPNcricinfo for the stats #IPL2026 😎. pic.twitter.com/rqOdB1dNjE— Cricket Nostalgiation (@RiteshJ88156274) April 1, 2026
आयपीएलच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची शमीची ही पाचवी वेळ आहे. अशा प्रकारे ५ वेळा पहिल्या चेंडूवर विकेट्स घेणारा तो आयपीएलमधील एकमेव गोलंदाज ठरला आहे. या यादीत ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा आणि भुवनेश्वर कुमार (प्रत्येकी ३ वेळा) हे दिग्गज शमीच्या बरेच मागे आहेत. विशेष म्हणजे, शमीने केएल राहुलला दुसऱ्यांदा डावाच्या पहिल्या चेंडूवर बाद करण्याचा पराक्रम केला आहे.
दिल्लीच्या फलंदाजीचे मोडले कंबरडे –
मोहम्मद शमीने केवळ विकेटच घेतली नाही, तर आपल्या भेदक माऱ्याने दिल्लीच्या फलंदाजांवर प्रचंड दबाव निर्माण केला. त्याने आपल्या पहिल्या ३ षटकांत अवघ्या २० धावा देत १ विकेट्स घेतली. या दरम्यान त्याने तब्बल ११ ‘डॉट बॉल’ टाकले, ज्यामुळे दिल्लीचा संघ पॉवरप्लेमध्येच अडखळला. शमीच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे दिल्लीने पॉवरप्लेमध्येच ३३ धावांवर ४ महत्त्वाचे गडी गमावले. आयपीएलमध्ये ११ व्या वेळी पहिल्याच षटकात विकेट घेण्याचा पराक्रमही आता शमीच्या नावावर जमा झाला आहे.





