LSG vs KKR : थरारक सुपर ओव्हरमध्ये कोलकात्याचा लखनौवर शानदार विजय! सुनील नरेन आणि रिंकू सिंग ठरले गेमचेंजर
LSG vs KKR : लखनौच्या इकाना स्टेडियमवर आयपीएल २०२६ मधील सर्वात थरारक सामना पाहायला मिळाला, ज्यामध्ये केकेआरने सुपर ओव्हरमध्ये शानदार विजया मिळवला.

LSG vs KKR Kolkata Knight Riders won in the Super Over : लखनौच्या इकाना स्टेडियमवर आयपीएल २०२६ मधील सर्वात थरारक सामना पाहायला मिळाला. लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील हा सामना बरोबरीत सुटल्यानंतर, निकालासाठी सुपर ओव्हरचा आधार घ्यावा लागला. अखेर या अटीतटीच्या लढतीत कोलकात्याने बाजी मारली. या विजयात रिंकू सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली.
आयपीएल २०२६ मधील पहिल्या सुपर ओव्हरचा थरार लखनऊच्या चाहत्यांना अनुभवता आला. प्रथम फलंदाजी करताना कोलकात्याने रिंकू सिंगच्या झुंजार ८३ धावांच्या जोरावर २० षटकांत १५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौच्या संघानेही कर्णधार ऋषभ पंतच्या ४२ धावांच्या खेळीनंतर मोहम्मद शमीने कार्तिक त्यागीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्याने २० षटकांत १५५ धावाच केल्या, ज्यामुळे सामना टाय झाला.
𝗬𝗼𝘂 𝗵𝗮𝘃𝗲 𝘁𝗼 𝘄𝗮𝘁𝗰𝗵 𝗶𝘁 𝘁𝗼 𝗯𝗲𝗹𝗶𝗲𝘃𝗲 𝗶𝘁 🤯
🎥 Mohd. Shami with a last ball six to take the game to a SUPER OVER 👊
Updates ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKKR pic.twitter.com/uS6SnVI5Ee
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनची जादू –
सुपर ओव्हरमध्ये लखनौकडून निकोलस पूरन आणि एडन मार्करम मैदानात उतरले. कोलकात्याने चेंडू सुनील नरेनच्या हातात सोपवला. नरेनने पहिल्याच चेंडूवर पूरनला क्लिन बोल्ड करत लखनौला धक्का दिला. दुसऱ्या चेंडूवर ऋषभ पंतने सिंगल घेतली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर मार्करमही मोठा शॉट खेळण्याच्या नादात झेलबाद झाल्याने लखनौला केवळ १ धाव करता आली. विजयासाठी २ धावांचे सोपे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या केकेआरसाठी रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केला.
#KKR win the first SUPER OVER of the season 🤩@kkriders with a hard earned win after 42 overs of topsy turvy cricket 👏
Scorecard ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKKR pic.twitter.com/yIoX0vQOMv
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
रिंकू सिंगची ऐतिहासिक खेळी –
Ruthless Rinku Singh raising the power-hitting standards in Lucknow 🔥
How many runs did he score on his last 13 balls? 🧐
Updates ▶️ https://t.co/elFxwvCeWO#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKK pic.twitter.com/t4EtQKe6P0
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करायाला उतरलेल्या कोलकात्याची सुरुवात अत्यंत खराब झाली होती, ३१ धावांत त्यांचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. १५ व्या षटकापर्यंत ७ बाद ९३ अशी स्थिती असताना रिंकू सिंगने ५१ चेंडूत नाबाद ८३ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने शेवटच्या षटकात सलग ४ षटकार मारून स्टेडियम डोक्यावर घेतले. रिंकूच्या या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. ज्यामुळे कोलकात्याला १५५ धावा करता आल्या.
मोहसिन खानने घेतल्या पाच विकेट्स –
8️⃣ dots
5️⃣ wickets
Only 3️⃣ boundary ballsA spell sending the #KKR line-up in disarray 🔥
WATCH IT HERE ▶️ https://t.co/o3aS9YrfuN#TATAIPL | #KhelBindaas | #LSGvKKR pic.twitter.com/nUVFhEVyX1
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2026
दुसरीकडे, लखनौच्या मोहसिन खानने ४ षटकांत २३ धावा देत ५ बळी टिपले, मात्र त्याची ही ऐतिहासिक कामगिरी रिंकूच्या वादळापुढे अपुरी पडली. तसेच अंगकृष रघुवंशीच्या ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ या वादग्रस्त विकेटनेही या सामन्यात मोठी चर्चा घडवून आणली. लखनौकडून फलंदाजी कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांनी साफ निराशा केली.





