Ajit Agarkar Contract : विश्वचषक २०२७ पूर्वी बीसीसीआयचा मोठा निर्णय! ‘या’ बाबतीत घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय
Ajit Agarkar Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्याबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Ajit Agarkar BCCI Contract Renewed : भारतीय क्रिकेट संघाने गेल्या दोन-तीन वर्षांत मिळवलेले दैदीप्यमान यश पाहता, बीसीसीआयने निवड समितीमध्ये सातत्य राखण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा करार आता जून २०२७ पर्यंत वाढवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची बांधणी आगरकर यांच्याच देखरेखीखाली व्हावी, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
कराराचे नूतनीकरण, मुदतवाढ नाही!
बीसीसीआयच्या नियमानुसार, कोणताही निवडकर्ता जास्तीत जास्त चार वर्षे या पदावर राहू शकतो. आगरकर यांनी स्वतःहून मुदतवाढ मागितली नव्हती, मात्र त्यांच्या कामाची पावती म्हणून बोर्डाने त्यांचा करार रिन्यू केला आहे. त्यांच्या कार्यकाळात वरिष्ठ आणि युवा खेळाडूंचा योग्य ताळमेळ बसवण्यात आला असून, अनेक धाडसी निर्णयांनी टीम इंडियाला नवी दिशा दिली आहे.
Ajit Agarkar is expected to receive an extension to his tenure as India’s Chief Selector, as the Board of Control for Cricket in India is keen to maintain continuity ahead of the 2027 ODI World Cup.
Agarkar’s current tenure is set to conclude in June 2026; however, according to… pic.twitter.com/eKn66DgrQp
— DNA (@dna) April 19, 2026
आगरकरांच्या काळात आयसीसी ट्रॉफींची ‘हॅट्ट्रिक’ –
ऑक्टोबर २०२३ पासून मार्च २०२६ या अडीच वर्षांच्या काळात भारतीय संघाने क्रिकेट विश्वात आपले वर्चस्व गाजवले आहे. आगरकर मुख्य निवडकर्ते असताना भारताने सलग चार आयसीसी टूर्नामेंट्सच्या फायनलमध्ये धडक मारली, ज्यापैकी तीन स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे:
१. टी-२० विश्वचषक २०२४ (विजेते)
२. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (विजेते)
३. टी-२० विश्वचषक २०२६ (विजेते)
याव्यतिरिक्त २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. या नेत्रदीपक कामगिरीमुळेच आगरकर यांच्या खांद्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.





