Mohammed Shami Record : मोहम्मद शमीच्या गोलंदाजीसमोर हैदराबादचे ‘नवाब’ हतबल! झहीर खानला मागे टाकत केला खास पराक्रम
Mohammed Shami Record : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शमीने आपल्या अचूक माऱ्याने हैदराबादच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.

Mohammed Shami Powerplay Wickets Record IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १० व्या सामन्यात एलएसजी आणि एसआरएच यांच्यातील लढतीत मोहम्मद शमीच्या वेगवान गोलंदाजीने खास पराक्रम केला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शमीने आपल्या अचूक माऱ्याने हैदराबादच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात लखनै सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत हैदराबादच्या डावाला सुरुवातीलाच सुरुंग लावला. शमीने आपल्या पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फॉर्मात असलेल्या अभिषेक शर्माला बाद केले, तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवून हैदराबादला बॅकफूटवर ढकलले.
झहीर खानला टाकले मागे; पॉवरप्लेचा नवा ‘बादशाह’
MOHAMMED SHAMI HAS BOWLED ONE OF THE FINEST SPELL EVER 🤯
– 4 overs.
– 9 runs.
– 2 wickets.He still has got it. 🔥#mohammedshami #SRHvsLSG #IPLClicks #kbke #ipl #IPLLive #ipl2026 #cricket #news #cricketnews #CricketUpdates #SunrisersHyderabad pic.twitter.com/p07ahiavLH
— KBKE : Cricket & Bollywood 👁️ (@kahanibollyki) April 5, 2026
या दोन विकेट्ससह मोहम्मद शमीने आयपीएल इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचे माजी दिग्गज झहीर खान (५२ विकेट्स) यांना मागे टाकले आहे. शमी आता ५४ विकेट्ससह या यादीत ७ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा भुवनेश्वर कुमार ७९ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे.
आयपीएल पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
- भुवनेश्वर कुमार – ७९
- ट्रेंट बोल्ट – ७२
- दीपक चहर – ६७
- संदीप शर्मा – ६२
- उमेश यादव – ५८
- इशांत शर्मा – ५७
- मोहम्मद शमी – ५४
- झहीर खान – ५२
हेही वाचा – Shubman Gill Injury : शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? पार्थिव पटेलने केलं स्पष्ट
मोहम्मद शमीची ‘कंजूष’ गोलंदाजी –
मोहम्मद शमीने केवळ विकेट्स घेतल्या नाहीत, तर हैदराबादच्या आक्रमक फलंदाजांना धावांसाठी तरसवले. आपल्या कोट्यातील ४ षटकांमध्ये शमीने केवळ ९ धावा खर्च केल्या आणि २ महत्त्वाच्य विकेट्स घेतल्या. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी संघर्ष करताना दिसला. शमीच्या या कामगिरीमुळे लखनौला सामन्यावर पकड मिळवणे सोपे झाले.





