मुंबई – बॉलिवूडमधील गुणी अभिनेत्री म्हणून तापसी पन्नूची ओळख आहे. अभिनयासोबतच तापसी आपल्या शांत स्वभावासाठी देखील ओळखली जाते.क्विचितच तापसी कोणावर भडकलेली पाहायला मिळते. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये ती चांगलीच चिडलेली दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये ती पापाराझींवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती फोटो क्लिक करण्यास नकार देत आहे.यासाठी ती फोटो काढणाऱ्यावर भडकलेली दिसून येते. तापसी एका इमारतीतून बाहेर पडते आणि पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी तिच्याभोवती येऊ लागतात. पापाराझींना हे करताना पाहून ‘ऐसे मत करो’ असे म्हणत फोटो काढण्यासाठी ती नकार देते.
View this post on Instagram
तापसीसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयुष्मान खुरानाच्या दिवाळी पार्टीत तापसी पापाराझींसमोर दिसली होती. या दिवाळी पार्टीला तापसीनेही हजेरी लावली होती.यावेळी गाडीतून उतरल्यावर तिने फोटो काढणाऱ्यांना स्ट्रिक्टपणे सांगितलं होत.