सचिन गोळे
पारनेर – प्रश्न कोणता ही असो मनसे पदाधिकारी यांच्याकडे गेल्यावर नक्कीच मार्ग निघतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी कामं करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सदैव तत्परतेने लढा देत असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्याध्यक्ष सचिन गोळे यांनी काढले.
मनसे कामगार सेनेचे राज्याध्यक्ष सचिन गोळे गुरुवारी नगर दौऱ्यावर आले. सुपा येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांच्या पवारवाडी येथील निवासस्थानी जाऊन आई / वडिलांना भेटून तब्येतीची विचारपूस करत चर्चा केली. अविनाश आमच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे टेन्शन वगैरे काही घेऊ नये, असा विश्वास दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नसून कुटुंबच असल्याची भावना पवार यांच्या आई यांनी आपसुक व्यक्त केली.
गोळे म्हणाले की, पवार हे कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. यापुढेही कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के, तालुका सचिव नारायण नरवडे, सतीश म्हस्के, अक्षय सुर्यवंशी, सुपा सोसायटीचे सदस्य विजय पवार, शहाजी येवले, मंगेश शिंदे, संतोष शिंदे, देवीदास कुलट, माधव पठारे यांच्या ह माथाडी कामगार, महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.