अफगाणिस्तानात इंटरनेट बंद, मोबाईल नेटवर्कही बंद ; तालिबान सरकारने धक्कादायक निर्णय का घेतला? वाचा

Afghanistan New Rule। अफगाणिस्तानात कालपासून इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तालिबान सरकारच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. काबुल, उरुझगान, मजार-ए-शरीफ आणि हेरातसह अनेक शहरांमध्ये फायबर-ऑप्टिक इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर काही काळासाठी मोबाईल इंटरनेट काम करत असले तरी, सिग्नल टॉवर बंद पडल्याने ती देखील कोलमडले.
एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, “मोबाईल आणि सॅटेलाइट टीव्ही सेवांवर परिणाम झाला आहे. तालिबान सरकारने पुढील सूचना येईपर्यंत इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद राहतील” असे म्हटले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, काबुल विमानतळावरून निघणाऱ्या अनेक विमानांवरही परिणाम झाला आहे, काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
देशभरात मोबाईल आणि इंटरनेट बंद Afghanistan New Rule।
यापूर्वी, कंदहार, बल्ख, उरुझगान आणि निमरोझमध्ये फायबर-ऑप्टिक नेटवर्क बंद करण्यात आले होते, परंतु आता देशभरात इंटरनेट बंद आहे. या ब्लॅकआउटमुळे, अफगाणिस्तानमधील आंतरराष्ट्रीय कॉल अशक्य आहेत. मोबाईल नेटवर्क बंद झाल्यामुळे, अफगाणिस्तानमधील लोक व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांसाठी एकमेकांशी संपर्क साधू शकत नाहीत.
अफगाणिस्तानात इंटरनेट का बंद करण्यात आले? Afghanistan New Rule।
तालिबान सरकारने इंटरनेट बंद करण्याचे कारण दिलेले नाही, परंतु असा दावा केला जात आहे की तालिबानने अनैतिक कृत्यांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तालिबान राजवटीमुळे अफगाणिस्तानमध्ये आधीच अनेक निर्बंध आहेत आणि आता इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे.
तालिबानने मुलींना शाळा आणि विद्यापीठात जाण्यास बंदी घातली आहे आणि ऑनलाइन वर्ग आता शक्य होणार नाहीत. असे मानले जाते की महिलांवरील हे निर्बंध अफगाणिस्तानमधील सर्वात कठोर आहेत. इंटरनेट बंदचा स्थानिक व्यवसायांवरही परिणाम होऊ शकतो.





