Asia Cup 2025 : अफगाणिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2025 AFG vs HK match updates : आशिया कप २०२५ स्पर्धेला आज अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांत स्पर्धेतील पहिला सामना अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी दिली आहे? जाणून घेऊया.
दोन्ही संघांतील हेड-टू-हेड रेकॉर्ड –
या दोन्ही संघांमधील पहिला टी-20 सामना 2014 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यात टी-20 स्वरूपात एकूण सहा सामने झाले आहेत. यापैकी चार सामन्यांत अफगानिस्तानने बाजी मारली, तर हाँगकाँगने दोन सामने जिंकले. 2012 च्या टी-20 विश्वचषक पात्रता फेरीत अफगानिस्तानने हाँगकाँगवर 9 गडी राखून विजय मिळवला होता.
#AsiaCup2025: Afghanistan won the toss and opted to bat first against Hong Kong in the Asia Cup 2025 opener in Abu Dhabi.
📸: Sony LIV#AFGvsHK pic.twitter.com/zugp50QZIR
— CricTracker (@Cricketracker) September 9, 2025
त्यानंतर मार्च 2014 मध्ये त्यांनी 7 गडी राखून विजय मिळवला. जुलै 2015 मध्ये हाँगकाँगने पहिल्यांदा अफगानिस्तानवर विजय मिळवला, तर नोव्हेंबर 2015 मध्ये पुन्हा एकदा विजय मिळवत हेड-टू-हेड रेकॉर्ड 2-2 असे बरोबरीत आणले. 2016 मध्ये अफगानिस्तानने हाँगकाँगविरुद्ध दोन सामने जिंकत पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
हेही वाचा – Asia Cup 2025 : आशिया कप विजेत्या संघाला किती पैसे मिळणार? यंदा बक्षीस रकमेत तब्बर इतक्या टक्क्यांनी वाढ
अफगाणिस्तानची (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), सेदीकुल्लाह अटल, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, राशीद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गझनफर, फजलहक फारुकी
हाँगकाँग (प्लेइंग इलेव्हन): झीशान अली (यष्टिरक्षक), बाबर हयात, अंशुमन रथ, कल्हान छल्लू, निजाकत खान, एजाझ खान, किंचित शाह, यासीम मुर्तझा (कर्णधार), आयुष शुक्ला, अतीक इक्बाल, एहसान खान





