Shreyas Talpade : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती काल बुधवारी समोर आली. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ ( Welcome to jungle ) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये श्रेयस सध्या व्यस्त आहे. चित्रपटाचे शुटींग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अस्वस्थ वाटले आणि तो लगेच जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रेयस बाबतचे वृत्त समोर येताच चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरु केली. अशात श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदेने ( Dipti talpade ) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत श्रेयसच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते चिंता व्यक्त करत होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्याच्या पत्नीतने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. ( Shreyas talpade health update)
दीप्ती तळपदेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती म्हणते,”माझ्या पतीच्या आरोग्य संकटानंतर अपार चिंता आणि शुभेच्छांबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते. त्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज मिळेल”
View this post on Instagram
नेमकं काय घडलं?
श्रेयस 14 डिसेंबर 2023 रोजी ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाचं शूटिंग करत होता. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो सेटवरुन घरी गेला. शूटिंगदरम्यान तो पूर्णपणे ठिक होता. त्यावेळी त्याने अनेक अॅक्शन सीन्सचं शूटिंग केलं. शूटिंगमधून घरी गेल्यानंतर अस्वस्थ असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले, पण वाटेत त्याला हृदयविकाराचा झटका आला.
श्रेयस तळपदेने मराठीसह बॉलिवूड आणि साऊथमध्येही उत्तम काम केले आहे. सध्या श्रेयस अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या बहुचर्चित सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमात श्रेयस आणि अक्षयसह रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, कृष्णा अभिषेक परेश रावल, अर्शद वारसी, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लिव्हर हे कलाकार देखील आहेत.