पुणे – लोकमान्य टिळक प्रतिष्ठान आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत बाजीराव रस्त्यावरील नातू बाग मैदानावर ‘स्वस्त दिवाळी, मस्त दिवाळी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्य नागरिकांना दिवाळीच्या फराळापासून, दिवाळी साजरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू, साहित्य एकाच छताखाली आणि स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात, या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सायंकाळी पाच वाजता होणार आहे. येथे 40 स्टॉल्स असतील.
बाजारभावापेक्षा कमी किमतीत स्टॉल्सद्वारे दर्जेदार साहित्याची विक्री केली जाईल. फटाके वगळता सर्व वस्तू स्टॉलमध्ये उपलब्ध असतील. यात 100 रुपयांमध्ये तीन किलो साखर दिली जाणार असून, या सुविधेचा लाभ 25 हजार नागरिकांना घेईल. दि. 3 ते 5 नोव्हेंबर या दिवशी उपक्रमाची वेळ सकाळी 8 ते रात्री 10 अशी असेल. तसेच या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेलचेल असेल.